काही आवडलेलं ………
दोन पाटांच्या भिंतींनी उभे केलेले घरकुल
इटुकल्या पोळपाटावर लाटलेल्या गूळपोळीच्या पोळ्या
ठेचलेल्या शेंगदाण्यांचा भात
चुरमुरयात तिखट-मीठ, पाणी घालून केलेली आमटी
रिकाम्या कपातील चविष्ट चहा
तो आल्यागेल्याचा पाहुणचार
दुखण्याखुपण्यावरील ते वैद्यांचे उपचार
बाळाला न्हाऊ घालणे आणि बाहुलीला दागिन्यांनी मढवणे
मांडवातील भांडणे आणि ते चट्ट्यामट्ट्याचे साखरपेरणे
मांडलेली भातुकली अशी रंगते… अशी रंगते
आणि केव्हा एकदा पेटारयात मिटून जाते…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा